मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाला राज्य सरकारने आतापर्यंत जी आश्वासने दिली त्यातील एकाचीही पूर्तता सरकारने केलेली नाही. मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या 42 जणांच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्याचे आश्वासनही पाळले नाही.त्या निषेधार्थ आज (दि.8 ) क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 58 मूक मोर्चे काढण्यात आले त्यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण,सारथी संस्थेला 10 कोटी रुपये, अण्णासाहेब पाटील महामंडळास आर्थिक मदत देण्यात यावी, आरक्षणातील 42 युवकांनी आपले बलिदान दिले त्यांच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देण्याचे वचन दिले होते. गत महिन्यात 5 ऑगस्ट पर्यंत सरकार मराठा समाजाचे प्रश्न सोडवेल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यांनी सदर आश्वासन पाळले नाही. याची आठवण सरकारला करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रमेश केरे पाटील, अप्पासाहेब पुडेकर, पंढरीनाथ गोडसे पाटील, शिवम केरे पाटील ,बाळकृष्ण लेवडे पाटील, अनिल सपकाळ, ज्ञानेश्वर लेवडे पाटील सहभागी झाले होते.